पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे.
यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकतं असा चिमटा देखील बापट यांनी काढला. मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणं हा संदेश आजवर सरकारच्या माध्यमातून गेला आहे. परंतु भविष्यात काय होईल याची चुणूक यातून दिसते, असेही बापट म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीला आणि विशेषतः शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो आहे. मंत्रिमंडळ विस्तारात संधी न दिली गेल्याने शिवसेनेतील नेते नाराज आहेत. शिवसेनेतील जे नेते नाराज आहेत ते शिवसैनिकच नाहीत अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News