Good News! सोने स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी; असा करून घ्या फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोना काळामध्ये गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला. सध्याचा काळामध्ये गुंतवणुकीला सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. पण सोन्याचे वाढलेले भाव गुंतवणूक मंदावत होते. यामुळे अनेकजण सोन्याचे भाव उतरण्याची वाट पाहत आहेत. येत्या एक तारखेला म्हणजेच बजेटच्या दिवशी स्वस्तात सोने खरेदी करण्याची मोठी संधी आली आहे. जाणून घ्या या संधीबद्दल.

एक फेब्रुवारीला सोवरेन गोल्ड बाँड स्किमच्या 11 व्या सेरिजचे सबस्क्रिप्शन खुले होत आहे. भारतीय रिझर्व बँकेने या स्किमची इश्यू किंमत ही 4912 रुपये प्रति ग्राम इतकी निश्चित केली आहे. या स्कीममध्ये 1 ते 5 फेब्रुवारीच्या काळामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. सोवरेन गोल्ड बाँड हा डिजिटल सोन्याचा उत्तम मार्ग आहे पण सोन्याचा भाव पडला तर नुकसान होऊ शकते.

बजेटनंतर सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. सोन्यावर इम्पोर्ट डुटी (12.5%) आणि जीएसटी (3%) लागत असल्यामुळे सोन्याचे भाव सद्ध्या जास्त आहेत. ही टक्केवारी कमी करण्याची विनंती खूप दिवसापासून व्यापारी करत आहेत. यावेळच्या बजेटमध्ये इम्पोर्ट ड्युटी कमी होण्याची शक्यता आहे. ही ड्युटी कमी झाली तर सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होऊ शकते. यामुळे या काळात सोन्यात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.