SBI ग्राहकांसाठी खूषखबर! ३० जूनपर्यंत ATM वरुन कितीहीवेळा पैसे काढता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की ते एसबीआयच्या एटीएममधून केलेल्या व्यवहारांवरील सेवा शुल्क माफ करतील. एसबीआय ग्राहक ३० जूनपर्यंत इतर कोणत्याही बँकेच्या एटीएमवर ही सुविधा घेऊ शकतात. यासंदर्भात बँकेने १५ एप्रिल २०२० रोजी आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत घोषणा केली आहे.

संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआयच्या एटीएम आणि इतर बँकांमध्ये केलेल्या सर्व एटीएम व्यवहारांचे एटीएम शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण विनामूल्य व्यवहाराच्या संख्येपेक्षा जास्त वेळा रक्कम काढली असेल तर ३० जूनपर्यंत आपल्याला ही सुविधा मिळेल.

 

२४ मार्च रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते की ३० जूनपर्यंत इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी बँकेच्या ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. डेबिट कार्डधारक इतर कोणत्याही बँकांकडून विनामूल्य पैसे काढू शकतात. कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

एसबीआयने १५ एप्रिलपासून बचत ठेव खात्यातील व्याजदरात कपात केली आहे. बचत खात्यातील ठेवीवर २.७५% दराने व्याज दिले जाईल. एसबीआय बचत ठेवींवरील व्याजदर ०.२५% ने कमी केला आहे. आतापर्यंत बँक बचत ठेवींवर ३% व्याज देत होती.याशिवाय स्टेट बँकेने सर्व मुदतीच्या कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेन्डिंग रेट (एमसीएलआर) मध्येही ०.३५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment