Google देणार पेटीएम अन् फोनपेला जोरदार टक्कर, आता दुकानात पेमेंट करणे होणार सोपे !!!

Google Pay
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही काळापासून Google कडून भारतात Google Pay साठीच्या UPI साउंडबॉक्सवर काम सुरु आहे. याद्वारे डिजिटल पेमेंटबाबत व्यापाऱ्यांना अलर्ट करता येईल. एका मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉन बेस्ड ToneTag कडून हे साउंडपॉड तयार करण्यात आले आहेत. आता गुगलकडून याचे Google Pay साउंडपॉड म्हणून मार्केटिंग केले जात आहे. प्रयोग म्हणून दिल्लीसहीत काही ठिकाणी या साउंडबॉक्सचे वितरणही करण्यात आले आहे.

Google Pay: How to use app, what is Google Pay customer care number, and  more questions answered | 91mobiles.com

गुगलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की,”आम्ही ग्राहक आणि व्यापार्‍यांसाठी डिजिटल पेमेंट आणखी सोयीस्कर बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपायांसह प्रयोग करत आहोत.”

SoundPod वर असेल QR कोड

या SoundPod मध्ये Google Pay for Business खात्याशी लिंक केलेला व्यापारी QR कोड देखील असेल. TechCrunch च्या एका रिपोर्टनुसार, या डिवाइसमध्ये एक इन-बिल्ट स्पीकर असेल जो वेगवेगळ्या भाषांमध्ये पेमेंटची माहिती देईल. इतकेच नाही तर एक छोटा एलसीडी पॅनल देखील असेल, जो पेमेंटची रक्कम, बॅटरी आणि नेटवर्कचे स्टेटस सांगेल.

Google Pay பரிவர்த்தனை வரலாற்றை நீக்குவது எப்படி? உடனே தெரிஞ்சுக்கோங்க.. |  How To Delete Google Pay Transaction History Easily - Tamil Gizbot

भारतात ट्रान्सझॅक्शनसाठी टॅप-अँड-पे मोड वापरला जात नसल्याने आणि लो-एंड स्मार्टफोनमध्येही NFC हार्डवेअर इंटिग्रेटेड नसल्याने या साउंडबॉक्समध्ये NFC सपोर्ट असणार नाही. मात्र युझर्स साउंडबॉक्समध्ये असलेल्या QR कोडद्वारे कोणत्याही UPI बेस्ड App वरून पेमेंट करू शकतील.

Google Pay: How to check and delete transaction history in Google Pay -  Pricebaba.com Daily

गेल्या काही काळापासून गुगलची भारतीय बाजारपेठेमध्ये फोनपे, भारतपे आणि पेटीएमशी स्पर्धा सुरु आहे. या कंपन्यांकडून बाजारात आधीच साउंडबॉक्स आणला गेला आहे. त्याच्या मदतीने डिजिटल पेमेंटची प्रक्रिया सुलभ होते. अशा परिस्थितीत आता गुगलकडूनही ते लॉन्च केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pay.google.com/

हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???