महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेणारी एकही सक्षम व्यक्ती नाही ; पडळकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याच्या निर्णय घेतला. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आज महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “राज्यात गरिबांची मुले ही आता सरकारच्या या निर्णयामुळे कशी शिकणार याचा विचार या सरकारने नियमावली बनवताना, शाळा बंदचा निर्णय घेण्यापूर्वी करायला हवा होता. या महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती नाही,” अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त म्हणाले की, जेव्हा कोरोना राज्यात आला आहे. त्या वेळेपासून राज्यामध्ये या आघाडी सरकारचे धोरण हे पूर्णपणे गोंधळलेले आहे. निर्बध लावताना, शाळा बंदसह इतर निर्णय घेत असताना नेमके काय करावे? काय निर्णय घ्यावा? याबाबत विचार करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता या सरकारमध्ये निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती नसल्यामुळे सरकारचा हा गोंधळ अनेकदा उघडा होतोय.

राज्य सरकावर टीका करताना पडळकर पुढे म्हणाले कि, राज्य सरकारने नुकताच शाळा बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात दारुची दुकाने चालू आहेत आणि शाळा बंद केल्या जात आहेत. आता या सगळ्या मराठी शाळांमध्ये मुले ही गोरगरिबांची आहेत. राज्य सरकारच्या या शाळा बंदच्या निर्णयामुळे पुढच्या पिढीचे केवढे मोठे नुकसान होणार आहे. पुढच्या दहा वर्षानंतर आपल्याला याचे परिणाम जाणवणार आहेत, असेही यावेळी पडळकर यांनी म्हंटले.