सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक.., पडळकरांची खोचक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अहमदनगर येथे धनगर समाजाच आंदोलन सुरू असताना त्याठिकाणी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आता या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका करत असताना, “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक” असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता राज्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक

गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद नवीन नसला तरी यावेळी सुप्रिया सुळेंवर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे. गोपीचंद पडळकर यांच्याकडून शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे. यावेळी ते म्हणाले की, अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे. ही लबाड लांडग्याची लेक बोलतेय. त्यावर फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार काय बोलले, याला आम्ही काळीची किंमत देत नाही

त्याचबरोबर, “(सुप्रिया सुळे) तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापाने, तुम्ही, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे बघितलं नाही. तर तुम्ही जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आता आमची लोकं सगळी हुशार झाली आहेत. मुलं सगळी हुशार झाली आहेत. लोकांची त्यांच्या विषयीची भावना ही त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार काय बोलले, याला आम्ही काळीची किंमत देत नाही” अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

अजित पवारांवर टीका

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. परंतु त्यांनी अजित पवार यांना पत्र पाठवले नाही. याबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले की, अजित पवार यांची भावना आमच्या विषयी स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही.