सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे विटा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर येथील 55 वर्षीय रामसखा सत्तर मौर्य हे यंत्रमाग कामगार म्हणून गेल्या अनेक वर्षभरापासून विटयातील मुंढेमळा येथे कामास आहेत. लॉकडॉनमुळे ते विट्यात अडकून पडले होते. त्यांचे कुटुंबिय उत्तरप्रदेश येथे आहे. ते गावी जाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. पण प्रशासनाकडून रितसर परवानगी मिळत नव्हती. त्यांनी गेल्या आठवड्यात विटा येथील तहसील कार्यालयात प्रवासाच्या ऑनलाईन पाससाठी अर्ज केला होता. आज गुुरूवारी सकाळी त्यांना विटा येथील तहसील कार्यालयातून फोन आला होता.
तुमची गावाकडे जाण्याची व्यवस्था झाली आहे. तुम्ही उद्या सकाळी 1१० वाजता विटा बसस्थानकातून मिरजसाठी एसटी आहे. तुम्ही आवरून या. मिरजेतून आपल्या गावी उत्तरप्रदेशकडे जाण्यासाठी ट्रेनची सोय आहे. त्यात तुमचे तिकीट आहे. ही बातमी फोनवर ऐकल्यावर रामसखा यांना अत्यानंद झाला. ते येथील मुंढेमळ्यातील परिसरात राहणार्या मित्राला ही आनंदवार्ता सांगण्यासाठी पळतच सुटले. परंतु वाटेतच ते चक्कर येऊन पडले. त्यांना तेथील सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी त्यांना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.