‘टॉम अँड जेरी’ चे दिग्दर्शक जॉन डिच यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टॉम आणि जेरी हे जगभरात सर्वाधिक आवडले जाणारे कार्टून आहे.जगभरात आवडले जाणारे हे कार्टून देणारे ऑस्करविजेते दिग्दर्शक जीन डिच यांचे नुकतेच निधन जाहले आहे.प्रसिद्ध अ‍ॅनिमेटर,निर्माता आणि दिग्दर्शक जीन डिच हे ९५ वर्षांचे होते. टॉम आणि जेरी या प्रसिद्ध कार्टून कॅरॅक्टरद्वारे जीनला सर्वाधिक ओळख मिळाली, त्याने अ‍ॅनिमेशनविषयी जगाला जागरूक केले. त्यांचा लघुपट मुनरोला १९६० मध्ये सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.१९६४ मध्ये, डिचला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले. यापूर्वी सन १९५८ मध्ये जीनने टॉम टेरिफ मालिका देखील तयार केली होती, त्याने आणखी एक मालिका को-प्रोड्यूस ‘सिडनीज फॅमिली ट्री’केली होती. याशिवाय त्यांच्या या दोन्ही मालिकांना १९५८ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते.

वृत्तसंस्था एपीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री जीन डिच यांचे प्राग येथील अपार्टमेंटमध्ये निधन झाले. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही.जीन डिचचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ मध्ये शिकागो येथे झाला होता आणि १९५९ मध्ये ते प्राग येथे गेले आणि तेथे फक्त १० दिवसच राहण्याचा त्यांचा विचार होता पण तेथे त्याला जुडेन्को सापडली. ते तिच्या प्रेमात पडले आणि त्यांनी झेकोस्लोवाकिया येथेच घर घेतले आणि लग्न केले.

जीन डिचचे आयुष्य साहसीपणाने भरलेले होते, जीन आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैन्यात भरती झाला,नंतर त्याने सैन्याच्या वैमानिकांना प्रशिक्षण दिले, जीनन बर्राच काळ लष्करात राहिला परंतु १९४४ मध्ये प्रकृती अस्वस्थतेमुळे त्याने सैन्याला निरोप दिला. लष्कराची नोकरी सोडल्यानंतर जीनने अ‍ॅनिमेशनमध्ये आपला हात आजमावला आणि टॉम अँड जेरी म्हणून जगाला माहित असलेल्या प्रसिद्ध कार्टून कॅरॅक्टर्सना जन्म दिला.जॉन डिचने टॉम आणि जेरीचे १३ भाग दिग्दर्शित केले. त्यांनी पोपाय द सेलर या मालिकचेही काही भाग दिग्दर्शित केले आहेत. अ‍ॅनिमेशनमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल जीनला २००४ मध्ये Winsor McCay पुरस्काराने गौरविण्यात आले.

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानने जीन डिचच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे –


View this post on Instagram

 

RIP ❤️ #GeneDeitch #Legend #Immortal

A post shared by Zareen Khan ????????✨???????? (@zareenkhan) on Apr 20, 2020 at 10:33am PDT

 

टॉम आणि जेरीच्या वडिलांच्या निधनाने टीव्ही अभिनेता वरुण ग्रोव्हरनेही दुःख व्यक्त केले आहे.

 

 

केवळ सेलिब्रिटीच नाही तर भारताचे सर्व चाहतेही त्यांच्या निधनामुळे खूप दु: खी झाले आहेत आणि ट्विट करून श्रद्धांजली वाहात आहेत.

 

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment