धक्कादायक ! पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने साथीदाराची केली हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने आपल्याच साथीदाराची गोळ्या घालून हत्या (killed) केली आहे. नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरात ही घटना घडली आहे. अविनाश अशोक घुमडे असे हत्या (killed) करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

काय घडले नेमके?
अविनाश घुमडे आणि दीपक घनचक्कर दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. दोघेही अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे. दोघेही नेहमी सोबतच राहायचे. घटनेच्या दिवशीदेखील दोघेही एकत्र होते. यावेळी अविनाश दीपकच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि दीपकने आपल्या अन्य तीन ते चार साथीदारांच्या मदतीने अविनाशची हत्या (killed) केली.

याची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…