दारू ढोसून पतीचे हैवानी कृत्य ! पत्नीची गळा आवळून केली हत्या

0
235
Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून (Murder) केला आहे.हा आरोपी मद्यपान करून पत्नीला मारहाण करत होता. यातूनच हि हत्या (Murder) करण्यात आली आहे. अवंतिका शर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. शिवम पचौरी असे आरोपीचे नाव असून हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या दोघांनाही तीन वर्षांची मुलगी आहे. मद्यपान केलेल्या शिवमने पत्नी अवंतिकाचे डोके भिंतीवर, किचनवर आपटून गळा आवळून तिचा खून (Murder) केला. त्यानंतर स्वतः पोलीस कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली. आपल्या तीन वर्षीय मुलीसमोर या नराधमाने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याने ती प्रचंड घाबरली होती.

पती-पत्नीमध्ये होत होता वाद
आरोपी शिवम हा आयटी कंपनीत काम करत होता. मात्र सध्या तो बेरोजगार होता. शिवम हा दररोज दारू प्यायचा. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये रोज वाद होत होता. दोन दिवसांपूर्वी शिवम हा दारू पिऊन आला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून त्याने पत्नी अवंतिकाचे डोके, भिंतीवर किचनवर आदळले. एवढेच नाही, तर गळादेखील आवळला. त्यामुळे अवंतिकाचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व घडत असताना त्यांची तीन वर्षीय मुलगीदेखील समोरच होती. या सगळ्या प्रकारानंतर शिवमने स्वतः पोलीस कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली. यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवमला अटक केली आहे.

आधीही घडली होती अशीच घटना
मागील मार्च महिन्यात अशीच एक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे या ठिकाणी घडली होती. यामध्ये घरातील अतिशय क्षुल्लक कारणावरून एकाने पत्नीला मारहाण करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. हत्येचा प्रयत्न केल्यानंतर पती स्वत: चिंचवड पोलीस ठाण्यात हजर झाला होता. यानंतर चिंचवड पोलिसांनी आरोपीला देहू रोड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

हे पण वाचा :

शिवसेनेच्या राज्यसभेतील पराभवामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र; भाजपच्या ‘या’ खासदाराने केले मोठे विधान

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

भाजपच्या यशामुळे ‘मविआ’च्या तोंडचं पाणी पळालंय; देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here