हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतने गुरुवारी HELO अॅपवर लाईव्हमध्ये दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या भारतीय संघाबद्दल आणि क्रिकेटबद्दल आपले विचार मांडलेत. या लाईव्हमध्ये त्याला डिव्हिलियर्सच्या फलंदाजीबद्दल विचारले असता. तो म्हणाला की,’जेव्हा-जेव्हा मी एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायचो तेव्हा-तेव्हा तो बाद व्हायचा. तो पुढे म्हणाला की,’ कदाचीत माझ्यावर बॅन नसता तर आज डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला नसता. कारण मी त्याला वारंवार बाद केले असते.’
श्रीसंतने धोनीच्या नीवृत्तीबाबत बोलताना सांगितले की,’ माहि भाई अजूनही खूप क्रिकेट खेळणार असून त्याला कोणाच्याही सल्यांची गरज नाहीय. बेन स्टोक्सने आपल्या ‘ऑन फायर’ या पुस्तकात धोनीवर टीका करत म्हटले होते की,’ वर्ल्ड कपमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनी निरूत्साही दिसला होता. यावर बोलताना श्रीसंत म्हणाला की,’ बेन स्टोक्सने धोनीबाबत उगाच काहीतरी बोलू नये. जर धोनीने मनात आणलं तर तो स्टोक्सची कारकीर्द संपुष्टात आणु शकतो.’
टी -२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या आठवणानंतर श्रीशांत म्हणाला की, वर्ल्ड कप २००३ पासून ऑस्ट्रेलियन फलंदाजांची त्याला इतकी चिड होती की, त्याला त्यांना मारण्याची इच्छा व्हायची. श्रीशांत पुढे म्हणाला, ‘मला आठवतेय की, मला मॅथ्यू हेडनला यॉर्करचा चेंडू टाकण्याची इच्छा होती पण त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. जर तुम्ही त्या सामन्याकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल की, मी त्या सामन्यात मोठ्या उत्कटतेने खेळत होतो. मला फक्त ऑस्ट्रेलियाचा पराभव करायचा होता. २००३ मध्ये वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे भारताला पराभूत केले ते माझ्या मनात नेहमीच होते आणि त्यामुळे मला त्यांना ठार मारण्याची इच्छा होती. ‘
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.