नवी दिल्ली । जर आपण नोकरी करत असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. कारण सध्याच्या काळात यूएएन क्रमांक खूप महत्वाचा झाला आहे. म्हणूनच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) भविष्य निर्वाह निधीधारकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सुविधा पुरविते. आयुष्यभर हाच नंबर राहतो, मग तुम्ही कितीही नोकर्या बदला. परंतु, आतापर्यंत असेही अनेक पीएफ खातेधारक आहेत ज्यांना त्यांचा UAN क्रमांक मिळालेला नाही किंवा ज्यांना तो मिळालेला आहे त्यांनी तो एक्टिवेट केलेला नाही. हे जाणून घ्या की, आपल्या सर्वांसाठी यूएएन नंबर खूप महत्वाचा आहे. याद्वारे भविष्य निर्वाह निधी खात्याचा तपशील मिळू शकेल. जर आपल्याला आपले यूएएन माहित नसेल तर आपण ते ईपीएफओ वेबसाइटवरूनही शोधू शकता.
UAN काय असते ?
आता (Universal Account Number) युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे आपले पीएफ खाते बंद करणे किंवा ट्रान्सफर करणे या त्रासातून लोकांना मुक्तता मिळाली आहे. एकदा UAN एक्टिवेट झाल्यानंतर आपले काम सोपे होईल. UAN मार्फत तुम्हाला ऑनलाईन पीएफ ट्रान्सफर, बॅलेंसह चेक आणि पैसे काढण्याची सुविधा देखील मिळेल. आपली सर्व जुनी आणि नवीन खाती या UAN मध्ये दिसतील.
EPFO पोर्टलवर UAN कसे एक्टिवेट करावे ते जाणून घ्या
यासाठी सर्व प्रथम, आपण EPFO https://epfindia.gov.in/site_en/ च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. आता आपल्याला our services वर क्लिक करावे लागेल. यानंतर, For Employees वर क्लिक करा. यानंतर, आपल्याला Member UAN/online services वर क्लिक करावे लागेल. आता आपल्याला UAN पोर्टलवर जावे लागेल. आपल्याला मोबाइल नंबर आणि PF मेंबर ID टाकावा लागेल. आता आपल्याला Get authorization PIN वर क्लिक करावे लागेल. तर PIN नंबर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. आता ओटीपी भरा. मग Validate OTP वर क्लिक करा. यानंतर आपले UAN एक्टिवेट होईल.
UAN स्टेटस कसे जाणून घ्यावे
आपले UAN स्टेटस जाणून घेण्यासाठी http://uanmebers.epfoservices.in/check_uan_status.php या लिंकवर क्लिक करा.
यानंतर, उघडलेल्या पेजमध्ये मागितलेली माहिती भरा. यात राज्याचे नाव, शहराचे नाव, इस्टेबलिशमेंट कोड आणि पीएफ खाते क्रमांक भरावा लागेल आणि चेक स्टेटस बटणावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला एक मेसेज दिसेल, ज्यामध्ये आपल्याला यूएएन नंबर आला आहे की नाही असे सांगितले जाईल. जर आपल्याला यूएएन नंबर मिळाला असेल तर आपण यासाठी आपल्या कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटशी संपर्क साधू शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.