कोरोनाशी युद्ध करायला भारतीय लष्कर मैदानात, उभारले ३ मोठे कोरोना दवाखाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय लष्कर २० एप्रिल पर्यंत कोरोनाव्हायरस ग्रस्त सामान्य रूग्णांसाठी तीन रुग्णालये तयार करत आहेत. यापैकी ४९० रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील, परंतु आपत्कालीन परिस्थितीत ही क्षमता ५९० पर्यंत वाढवता येऊ शकते. कोलकाताजवळील बॅरेकपूर, शिलांग आणि लिकाबली येथे ही रुग्णालये सुरू केली जात आहेत.

या व्यतिरिक्त लष्कराने चार क्विक रिअ‍ॅक्शन मेडिकल टीम्स देखील तयार केल्या आहेत ज्या कोरोनासंदर्भात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्वरित तैनात करता येतील. कोरोनाच्या प्राथमिक उपचारांसाठी १२०० बॅटलफील्ड नर्सिंग सहाय्यकांनी प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. त्यांना देशाच्या विविध भागात तैनात असलेल्या आर्मी कोरसोबत ठेवण्यात येणार आहे.

लष्कराने कोर ऑफ इंजीनियर्स आणि आर्मी मेडिकल कोरच्या सैनिकांसह देशभरात ६ कोविड रिस्पॉन्स टीम तयार केल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण भागातून संक्रमण साफ करणे आणि साफसफाई करणे यासारख्या कामांसह रुग्णांना त्वरित दिलासा देण्यासाठी हे पथक तयार करण्यात आले आहेत.

अरुणाचलमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर सैन्याने या सीमावर्ती राज्यात त्वरित कारवाई करण्यास सुरवात केली आहे. संपूर्ण तवांग शहराला संसर्गापासून मुक्त करण्यासाठी सैन्याने मोहीम सुरू केली आहे. काश्मिरातील अनंतनाग, कुलगाम, कुपवाडा, श्रीनगर आणि अखनूर येथे सैन्याने वैयक्तिक सुरक्षिततेसाठी डॉक्टरांच्या किट व्यतिरिक्त मास्क आणि सेनिटायझर्सही उपलब्ध करुन दिले आहेत. या भागात आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा नसल्यामुळे सैन्याची ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

Coronavirus: Indian Army to create 1250 additional quarantine beds ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

 

Leave a Comment