दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मासह ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कसोटीत अंगठ्याच्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळू शकणार नाही आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अंगठ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयकडून याची माहिती देण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) नवदीप सैनीसुद्धा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत (Rohit Sharma) डॉक्टरांच्या टीमचे म्हणणे आहे की, दुखापत पूर्णपणे बरी होण्यास अद्याप काही वेळ लागेल. त्याच्यावर उपचार सुरू असून बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत तो खेळू शकणार नाही. तर नवदीप सैनीच्या पोटाचे स्नायू ताणल्याने तोदेखील दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. तो उपचारासाठी रवाना होणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यु ईश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनादकट

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती