हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला भारत ऑगस्ट २०२१ ला १५ शक्तीशाली देशांच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करेल अशी माहिती समोर आली आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे सभासद देशांच्या अद्याक्षरावरून असते. अध्यक्षपद दर महिन्याला नव्या राष्ट्राला दिले जाते. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचा अध्यक्षपदाचा क्रमांक असे असे सांगण्यात आले आहे. बेल्जियम, डोमिनिकन रिपब्लिक, जर्मनी, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांच्या दोन वर्षांच्या मुदतीचा शेवट या वर्षाच्या शेवटी होत आहे. भारत आठव्यांदा या परिषदेच्या टेबलवर बसणार आहे.
यानंतर २०२२ मध्ये देखील भारताकडे पुन्हा अध्यक्षपद येईल. भारत, नॉर्वे, आयर्लंड, मेक्सिको आणि केनिया यांची बुधवारी 1 जानेवारी 2021 पासून सुरू होणाऱ्या यूएनएससीच्या (संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद) दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली. या परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच १९२ सदस्य देशाच्या राजदूत आणि राजनायकांनी साधारण सभेत सामाजिक अलगावचे नियम पाळत आपली मते दिली. कोरोनाच्या साथीच्या आजाराची पूर काळजी घेत मास्क लावून मतदान करण्यात आले तसेच सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.
भारताला १९२ पैकी १८४ मते मिळाली. ट्युनिशिया देश जानेवारी २०२१ ला पहिला अध्यक्ष असेल त्यानंतर मग अमेरिका, व्हिएतनाम, चीन, एस्टोनिया, फ्रान्स, भारत, आयर्लंड, केनिया, मेक्सिको आणि नायजर या राष्ट्रांना अध्यक्षपद मिळेल. २०२१ मध्ये भारत, आयर्लंड, केनिया, नॉर्वे आणि मेक्सिको या नवनिर्वाचित सदस्यांसह चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या पाच कायम सदस्यांसह युएनच्या उच्च-टेबलावर बसतील. त्यांच्या सोबत अस्थायी सदस्य एस्टोनिया, नायजर, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम हे देखील असतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.