हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चिनी कंपन्या किंवा चीनशी संबंधित तेल कंपन्यांकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबविली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार, सरकारने देशाला लागून असलेल्या इतर देशांशी आपले व्यापारविषयक धोरण कठोर केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी त्यांच्या आयातीच्या निविदेच्या अटींमध्ये काही नवीन तरतुदी जोडल्या आहेत. ज्यामुळे चीनी कंपन्यांसमवेतची तेल खरेदी बंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासूनच भारतीय तेल कंपन्यांनी CNOOC, Unipec, PetroChina अशा चिनी व्यापारी कंपन्यांना क्रूड इंपोर्ट टेंडर पाठविणे बंद केले आहे.
चिनी कंपन्यांची सर्व्हिस बंद
सरकारी तेल कंपन्यांकडे देशाच्या एकूण शुद्धीकरण क्षमतेपैकी 60 टक्के हिस्सा आहे. या तेल कंपन्या बर्याचदा स्पॉट मार्केटकडे वळतात. त्याचबरोबर चीन जगभरात कच्च्या तेलाचा व्यापार करत असला तरी चीन भारतात थेट तेल निर्यात करत नाही. याव्यतिरिक्त, जगभरातील अनेक तेल क्षेत्रात चिनी कंपन्यांचे भांडवल आहे.
देशातील सरकारी कंपन्यांची सध्याची आवश्यकता बर्यापैकी कमी आहे. कोरोना संकटामुळे मागणीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत नव्या नियमांचा परिणाम या स्थानिक कंपन्यांवर होताना दिसत नाही. मात्र, लवकरच त्याचा परिणाम पाहू शकू. परंतु कंपन्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि देशाच्या हिताला अधिक प्राधान्य देत आहेत.
मार्चमध्ये चीनशी झालेल्या संघर्षानंतर सरकारने नवीन नियम जाहीर केले होते, त्यानुसार भारताला लागून असलेल्या देशांच्या कंपन्यांना गुंतवणूक किंवा व्यवसाय करण्यासाठी पहिले सरकारची परवानगी घ्यावी लागेल. कोणत्याही देशाचा या नियमात उल्लेख नव्हता. भारत चीन, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हा चीनी कंपन्यांवर झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.