हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वारंवार आपल्या वादातीत कीर्तनामुळे नेहमीच चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज आता पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्यावर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या कीर्तनातून सातत्याने महिलांचा अपमान करणाऱ्या तसेच पुत्रप्राप्तीचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. यावर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई बोलल्या आहेत.शेवटी सत्याचाच विजय होत असतो, इंदुरीकरांवर आता संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झालेला आहे आता त्याची सुनावणी होईल आणि सर्व सत्य जनतेसमोर बाहेर येईल असे त्या म्हणाल्या आहेत.
इंदुरीकरांवर कीर्तनातून पुत्रप्राप्तीचा संदेश दिल्यामुळे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार आणि वारंवार कीर्तनातून महिलांचा अपमान करीत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भुमाता ब्रिगेडने तसेच इतर काही संघटनांनी केली होती. असेही असेही त्या म्हणाल्या आहेत. राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु कीर्तनातून पुत्रप्राप्तीचा संदेश देणाऱ्या इंदुरीकरांवर आता संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरताना प्राचीन ग्रंथांचा आधार या वाक्याला आहे असे सांगितले जात होते .परंतु पुत्रप्राप्तीचा सल्ला देणे,जाहिरात करणे हे पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार कायदेशीर गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र या गोष्टी वारकरी संप्रदाय, हिंदू धर्म यांच्याशी जोडून या संदर्भात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. असेही त्यांनी सांगितले आहे. पण आता सत्य समोर येईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.