अनुराग कश्यप च्या आरोपांवर अभय देओलने लिहिली इंस्टाग्राम पोस्ट; म्हणाला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा ख्यातनाम दिगदर्शक म्हणून ओळख असलेला अनुराग कश्यप हा सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्याने नुकतेच अभय देओल स्टार होण्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला होता. यावर आता अभय देओल ने इंस्टाग्राम वर पोस्ट लिहून खुलासा केला आहे. नेहमी स्पष्टपणे सोशल मीडियावर आपली मते मांडणाऱ्या अनुराग ने ‘देव डी’ सिनेमात अभय देओल सोबत काम करतानाचा स्वतःचा अनुभव सांगताना हे विधान केले होते. त्याने या खुलाशामध्ये मी भाग्यवान होतो म्हणून मला अनुराग कश्यप हा दिगदर्शक मिळाला असाही उल्लेख केला आहे.

‘२००९ मध्ये रिलीज झालेल्या “देव.डी” सिनेमाचा अनुराग दिगदर्शक होण्यापूर्वी मी अनेक लोकांना ही कल्पना सांगत एक वर्ष घालवला होता. हा सिनेमा नेहमीच एक आर्ट सिनेमा होता. मी आधी यासंदर्भातील पुस्तक वाचले होते आणि मला हे समजले होते की यातील पात्र एक अराजकवादी, चुकीचे, गर्विष्ठ आहे. दुसरीकडे स्त्रिया बळकट आणि एकनिष्ठ राहिल्या होत्या. मला ते बदलायचे होते. मला त्यांना सक्षम दाखवायचे होते. त्यांना स्वतंत्र आणि बळकट दाखवायचे होते. त्यांची ओळख त्या प्रेम करणाऱ्या पुरुषांवरून किंवा कोणत्याही पुरुषांवरूनही दाखवायची नव्हती.’ स्त्री पात्रावरून आमच्यात थोडेफार मतभेद झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


View this post on Instagram

 

“Dev.D” released in 2009. I spent a year narrating the idea to several people before I got Anurag on board to direct it. I remember people’s reaction upon hearing my narration, it was always, “it’s too much of an art-film”. Lucky for me Anurag got it. I had read the book and I could see that the character was a chauvinist, a misogynist, entitled, and arrogant. Yet he had been romanticized for decades! The women on the other hand were strong and had integrity, but there was still that expectation for them to love their man no matter what. I wanted to change that. I wanted to empower them, shed the image of the “good, devoted, woman”. It was time to make them independent, not defined by the man they love, or by men in general. Which is why Paro calls out Dev’s faults and puts him in his place. In my version Dev gets shot by the police (he becomes a drug dealer) outside Paro’s house and dies just like in the book. Chanda does not fall in love with him, and neither is she ashamed of being an East European high class escort (again, in my version ????). She’s the strongest character of the 3, and isn’t afraid of being judged. She does empathize with Dev, seeing how broken he is, and I went with the “prostitute with the heart of gold” theme from the book. Anurag felt a happy ending would make the film more accepted by the audience, and his twist was to have Dev & Chanda fall in love. My vision was too dark! I went with the flow, and even brought my buddies @twilightplayers to feature in it. The rest is history. #makingwhatbollywouldnt

A post shared by Abhay Deol (@abhaydeol) on Jun 20, 2020 at 2:16am PDT

 

त्यानंतर त्याने चित्रपटातील एका महिला पात्रावरुन त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले. अनुरागला चित्रपटाचा शेवट हा आनंदी हवा होता त्यामुळे त्यांच्यामध्ये मत भेद झाले होते. तसेच चित्रपटाच्या एडिटींगवरुनही वाद झाल्याचे म्हटले आहे.यापूर्वी अनुरागने एका मुलाखतीमध्ये अभय देओलसोबत काम करणे माझ्यासाठी कठिण असल्याचे म्हटले होते. तसेच तो देओल असण्याचा फायदा घेतो असे अनुराग म्हणाला होता. ‘त्याच्या सोबत काम करतानाच्या चांगल्या आठवणी नाहीत असे म्हटले होते. त्याला आर्टिस्टिक चित्रपटांमध्ये काम ही करायचे आहे आणि मेनस्ट्रीमचे फायदेही हवे आहेत. तो देओल असल्याचा फायदा घेता. चित्रपटाचे बजेट कमी असूनही तो फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होता. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणारे दिग्दर्शक त्याच्यापासून थोडे लांब होते. तो खूप चांगला अभिनेता आहे’ असे अनुराग म्हणाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment