‘या’ कारणामुळे ऋषभ पंतकडून काढून घेतले जाणार दिल्लीचे कर्णधारपद

Rishabh Pant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला होता. यामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये युएई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. शनिवारी बीसीसीआयने एक विशेष सभा घेऊन त्यामध्ये हा निर्णय घेतला. सध्याच्या गुणतालिकेत अव्व्ल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीला पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर नेणाऱ्या ऋषभ पंतला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते.

जर श्रेयस अय्यर हा युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी फिट झाला, तर तो दिल्लीचा कर्णधार असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामुळे श्रेयस अय्यर आयपीएल खेळू शकला नाही. यानंतर श्रेयस अय्यरच्या अनुउपस्थिमध्ये ऋषभ पंतला दिल्लीचे नेतृत्व देण्यात आले. ऋषभ पंतने एमएस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सला हरवून कर्णधार म्हणून आयपीएलमधला आपला पहिला विजय मिळवला होता.

आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांत दिल्लीने 8 पैकी 6 मॅच जिंकून 12 पॉईंट्सह अव्व्ल स्थान पटकावले आहे. गुणतालिकेत दिल्लीनंतर चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे बीसीसीआयने 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलमध्ये कोलकाता, दिल्ली, हैदराबाद टीमचे काही खेळाडू आणि चेन्नईच्या टीमचे प्रशिक्षक यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे मागच्या वर्षीची आयपीएलदेखील युएईमध्ये खेळवण्यात आली होती.