Wednesday, February 1, 2023

फडणवीसांनीच शरद पवारांच्या बदनामीची सुपारी पडळकरांना दिलीये; राष्ट्रवादीचा आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांना आणि खास करून शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. पण खरं तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच शरद पवारांची बदनामी करण्याची सुपारी पडळकरांना दिली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला. पडळकरांना फडणवीस यांची फूस असल्याचा आरोप करताना त्यांना आवरा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशा इशारा मुश्रीफ यांनी दिलाय.

शरद पवार यांना बदनाम करण्याची सुपारीच आमदार पडळकरांना देण्यात आली आहे. त्यांचा बोलविता धनी माजी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांचीच पडळकरांना फूस आहे. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा डाव खपवून घेतला जाणार नाही,’ असं हसन मुश्रीफ म्हणाले.

- Advertisement -

पडळकर नेमकं काय म्हणाले –

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले होते. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत अस म्हणत रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला.