जबलपूर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका भरधाव कारचा भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये अपघातग्रस्त भरधाव कारने रस्त्याच्या किनाऱ्यावर बाईक घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिली आहे. या अपघात (accident) एवढा भीषण होता कि कारने दिलेल्या धडकेत हा तरुण हवेत उडाला आणि 10 फूट लांब जाऊन पडला. या अपघातानंतर (accident) तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.
जबलपूरमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/B3Kr3njM79
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 8, 2022
काय घडले नेमके?
बुधवारी रात्री उशिरा 39 वर्षीय पिंटू बर्मन आपल्या बहिणींसह बाईकवरुन घरी परतला होता. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हे सर्वजणं घराच्या मुख्य मार्गावर आहेत. मात्र ते रस्त्यापासून लांब उभे आहेत. दोन्ही बहिणी बाईकवरुन उतरून दोन पावलं पुढे जातात. त्यावेळी अचानक एक भरधाव कार त्या दिशेने येते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हि कार बाइकवरील पिंटू बर्मन याला धडकते. हा अपघात (accident) एवढा भयंकर होता की, तरुण हवेत उडाला आणि 10 फूट लांब जाऊन पडला. यानंतर हि कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली.
या अपघातानंतर (accident) आरोपी कारचालक हे फरार झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच जखमी पिंटूच्या कुटुंबीयांनी तातडीने आजूबाजूच्या लोकांना बोलावलं आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे फरार आरोपी कारचालकांचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती