मुंबई प्रतिनिधी | प्रत्येकाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे साहजिकच आहे. मात्र जे शक्य आहे तेच होईल. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय अमित शहा यांच्या पातळीवर घेतला जाणार आहे. त्यामुळे इथं अंदाज लावणे योग्य ठरणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून देखील दोन्ही कडून मुख्यमंत्री पदाबाबत येणारी वक्तव्य थांबत नाहीत. प्रत्येकाला आपला मुख्यमंत्री व्हावा असे वाटते साहजिकही. त्यामुळे हि वक्तव्य येत असली तरी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या पातळीवरच मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाणार आहे असे चंद्रकांत पाटील म्हणले. पुण्याच्या छेडछाड प्रकरणावर देखील चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. त्या महिला पदाधिकाऱ्या सोबत मी संवाद साधला आहे. त्यांना कोणी त्रास दिला या बद्दल मी त्यांना विचारणा केली. त्यावर त्या म्हणाल्या कि मला निश्चित कोणाचे नाव सांगता येणार नाही. त्यामुळे ज्यांनी छेडछाड केली ते भाजपचे सदस्य असतीलच असे म्हणता येणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनाधार यंत्रे बद्दल माहिती देखील दिली आहे.या यात्रेचा पहिला टप्पा १ ऑगस्ट ते ०९ ऑगस्ट असा असणार आहे. या यात्रेच्या उद्घटणाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत. तर समारोपाला नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा आमचा निर्धार आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पहिल्या टप्प्यात यात्रा ५७ मतदारसंघात जाणार आहे तसेच हि यात्रा २८८ मतदारसंघात जाणार आहे असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट