मुंबई । संपूर्ण देशाला कोरोनाने जखडून ठेवलं आहे. दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत जाऊन अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोना प्रसारच मोठं केंद्र बनलेल्या मुंबापुरी म्हणजेच मुंबईत कोरोनाने हैदोस घातलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबईत संपूर्ण देशाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आहेत. एवढंच नव्हे तर मुंबईत या एक महिन्यात शंभरपटीने रुग्ण वाढले आहेत. अर्थात त्याला कारणही वेगवेगळी आहेत.
एका महिन्यापूर्वी मुंबईत फक्त ४६ रुग्ण होते. दरम्यान ही संख्या इतकी झपाट्याने वाढली की आज मुंबईत ४ हजार २०५ रुग्णसंख्या झाली आहे. राज्यात सध्या ६ हजाराहून अधिक रुग्ण आहे. त्यापैकी राज्याच्या एकूण ६५ टक्के रुग्ण एकट्या मुंबईतच आहेत. म्हणजे राज्याच्या रुग्णसंख्येपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईतच आहे. यावरून मुंबईत कोरोनाचा फैलाव किती किती मोठ्या प्रमाणात झाला आहे याचा अंदाज येतो.
तर दुसरीकडे मुंबईत कोरोनामुळं बळी जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मुंबईत आतापर्यंत १६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत वरळी, प्रभादेवीचा समावेश असलेल्या जी/दक्षिण प्रभागात सर्वाधिक ५०७ रुग्ण आहेत. त्यानंतर भायखळ्याचा समावेश असलेल्या ई प्रभागात ३६८ रुग्ण आहेत. मुंबईतील एकूण ८ प्रभागात २००हून अधिक रुग्ण असून ७ प्रभागात १०० हून अधिक रुग्ण आहेत. धारावीतही २१४ रुग्ण आढळले असून धारावीत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जवळ जवळ संपूर्ण धारावीच सील करण्यात आली आहे. धारावीतील मुकुंद नगर आणि डॉ. बलिगा नगरमध्ये रुग्णांचं आणि मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे.
मुंबईत रुग्ण संख्या अधिक असल्याने मुंबईतील अनेक भाग सील करण्यात आले असून २०० पेक्षा अधिक कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. मुंबईत वरळी, भायखळा, धारावी आणि प्रभादेवी या ठिकाणी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली असून भीतीचं वातावरण आहे. करोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबईचं अर्थचक्रही थांबलं आहे. त्यामुळे राज्यसरकारपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
कोरोना फोफावतोय! एकाच दिवसात आढळले रेकार्ड ७७८ नवे रुग्ण, गाठलं ६ हजाराचं शिखर#hellomaharashtra https://t.co/jmFhw83OdB pic.twitter.com/FFLaVPKheV
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 24, 2020
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”