कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूर, शेगाव देवस्थानांनी घेतला ‘देऊळ बंद’चा निर्णय

पंढरपूर । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये देशात१४ हजार रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ७ हजारांहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी गर्दीवर टाळण्यासाठी निर्बंध घातले आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक मंदिरानाही बंद करण्यात येत आहेत. पंढरपूरचे मंदिर आज आणि उद्या असे 48 तास बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तर विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानानेही भाविकांसाठी मंदिर बंद केलय.

पोलिस प्रशासनाकडून पंढरपूर हद्दीवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूरात येणाऱ्या वाहनधारकांचे नाव , मोबाइल नंबर घेऊन पुढे सोडले जात आहे. तसेच मास्कची देखील तपासणी केली जात आहे.भाविकांनी शहरात प्रवेश करू नये, मुक्काम करू नये व सद्यस्थिती मध्ये पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून मास्कचे वाटप केले जात आहे. माघ यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 257 मठांची तपासणी केली आहे. तर तालुक्यात 28 ठिकाणी तर शहरात 8 ठिकाणी नाकाबंदी केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांनी दिली.

तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like