आपल्या कारकिर्दीतच राम मंदिर निर्माण होवो; संजय राऊतांच्या योगी आदित्यनाथांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज ४८ वा वाढदिवस आहे. ४२ व्या वर्षापर्यँत सलग ५ वेळा खासदार बनण्यासोबतच वयाच्या २६ व्या वर्षी प्रथम खासदार झालेल्या योगीजींना सर्वात कमी वयात खासदार झाल्याचा सन्मान ही मिळाला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यांच्या अयोध्या लढाईचे कौतुकही केले आहे.

संजय राऊत यांनी योगींना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच, ‘मी त्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. अयोध्या लढाईत योगीजींनी नेहमीच मार्गदर्शन केले. त्यांच्या कारकिर्दीत राम मंदिर निर्माण होवो हीच शुभेच्छा!’ असेही म्हंटले आहे. अयोध्या येथे राममंदिर व्हावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात योगीजींचा मोठा वाटा आहे तसेच त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. गणितात एमएससी केलेल्या योगींनी वयाच्या २२ व्या वर्षी ब्रह्मलीन महंत अवैद्यनाथ यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि ते अजय सिंह बिष्टा चे योगी आदित्यनाथ झाले.

 

योगीं यांच्यावर अनेकदा मुस्लिम विरोधी असण्याचा तसेच सांप्रदायिक भाषण देण्याचा आरोप करण्यात आला आहे. गोरखपूरमध्ये झालेल्या दंग्याच्या वेळी त्यांना तुरुंगवासही झाला होता. २०१७ साली ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योगींना शुभेच्छा दिल्या असून योगीजींच्या समर्थनात राज्य विविध क्षेत्रात यश प्राप्त करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment