हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना कोरोनाची लागण झाली आहे. बिल गेट्स यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे देखील बिल गेट्स (Bill Gates) यांनी सांगितले आहे.
बिल गेट्स यांनी कोरोना लसनिर्मितीबद्दल भारताचे केलं कौतुक
आपण कोरोनाच्या जागतिक महासाथीच्या सर्वांत धोकादायक टप्प्यात प्रवेश करत आहोत, असा इशारा बिल गेट्स यांनी यगोदरच दिला होता. कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हॅरिएंटमुळे जगभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांनी हा इशारा दिला होता.
बुस्टर डोस आवश्यकच : बिल गेट्स
कोरोनाची महामारी अजून संपलेली नसताना आपण वर्तमानातील आपतकालीन परिस्थितीच्या पलिकडे पाहण्यास सुरूवात केलेली आहे. याच अर्थ असा की, आपण केवळ कोरोनावर नियंत्रण मिळवत नाही तर भविष्यात साथींचा रोगांचा उद्रेकच होणार नाही आणि संसर्गजन्य रोगांना लढा देण्यासाठी तयार आहे”, असे बिल गेट्स (Bill Gates) यांनी एका परिषदेत म्हंटले आहे. बिल गेट्स यांनी कोरोना लसनिर्मितीबद्दल भारताचे कौतुक केले तसेच कोरोनाची लस परवडणाऱ्या किमतीत जगातील इतर देशांना दिल्याबद्दल भारतीय उत्पादकांचीदेखील प्रशंसा केली आहे.
हे पण वाचा :
ट्रेनचे तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट कसे मिळवावे ते समजून घ्या
फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज
E-Commerce : खुशखबर !!! ‘या’ सरकारी वेबसाइटवर स्वस्त दरात खरेदीची संधी
सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा भाजपचा कार्यक्रम; शरद पवारांचा हल्लाबोल
10वी- 12वी चा निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार; बोर्डाची माहिती