मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकली अन् वाहतूक पोलिसांनं वाहनधारकाला चापट लगावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकल्याने एका पोलिसाने चक्क वाहनचालकालाच चापट लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला आहे. अचानक आव्हाड यांचा ताफा आल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट करून देताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. यावेळी एका पोलीस हवालदाराने एका वाहनधारकाला चक्क चापट लगावली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1531162365840211968

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर जितेंद्र आव्हाड यांचा ताफ पोहोचला त्यावेळी ही घटना घडली. आव्हाडांचा ताफा जात असताना अचानक एका चौकात वाहतूक कोंडी झाली होती. मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांचा ताफा थांबल्यामुळे पोलिसांची अडकलेल्या गाड्यांना बाजूला हटवण्यासाठी एकच धावपळ उडाली. आव्हाड यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने वाहनधरकावरच आपला राग काढला. जितेंद्र आव्हाड हे अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते.

यावेळी संतप्त झलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट एका जीप चालकाच्या हातावर चापट मारली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह शिवसेनेचे नेते संजय राऊत हेदेखील काल कोल्हापुरात होते. या दोन्ही नेत्यांची भेटही काल झाली. आमचे ठरले आहे, असे हातात हात देत संदेशही त्यांनी दिला होता. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांची कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ही भेट झाली होती. या भेटीवेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलनसुद्धा केले.

हे पण वाचा :

दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे

Leave a Comment