हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनकडून आयातीवरील बंदी आणि चीनविरोधी भावना यामुळे आता मोबाईल अॅक्सेसरीजच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबल यासारख्या मोबाइल अॅक्सेसरीजची 70-80 टक्के आयात ही चीनमधून होत होती. आता त्यांच्या किंमती या 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. चिनी वस्तूंची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. याआधीच्या पहिल्या लॉकडाउनच्या 2 महिन्यातही कोणतेही सामान आयात केले गेलले नाही.
सध्या चीनविरोधी भावना लक्षात घेता अनेक व्यापाऱ्यांनी पूर्वीची ऑर्डर रद्द केले आहेत. एका व्यावसायिकाने सांगितले, ‘आता सरकारने कंपोनेन्ट्स आणि अॅक्सेसरीज क्लियर केलेल्या आहेत. पण त्याचा थेट परिणाम बाजारावर झाला आहे. जीएसटी वाढल्याने आणि आयात थांबविल्यामुळे आज मोबाइल फोन्स 10 ते 15 टक्क्यांनी महाग झाले आहेत. बाजारात अजूनही सामानाची कमतरता आहे आणि अनेक गोष्टी या उपलब्धच नाहीत, ज्यामुळे काही वस्तूंच्या किंमती या 40 ते 50 टक्क्यांनी महागल्या आहेत.
रुपया घसरल्याचाही परिणाम
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या झालेल्या घसरणीमुळे कच्च्या मालाच्या किंमतीही वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत आता या अॅक्सेसरीज मोबाईलनंतर ग्राहकांच्या खिशावर ओझे टाकत आहेत
आवश्यक वस्तूंची आयात करणे चुकीचे नाही
उल्लेखनीय हे आहे की, गेल्याच आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चीनकडून होणाऱ्या आयातीबाबत असे म्हटले होते की, “अशा प्रकारच्या आयातींमध्ये चूक नाही , ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढू शकेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ते नक्कीच असले पाहिजे. मात्र, जी आयात रोजगार वाढण्यास किंवा ग्रोथ वाढीस मदत करत नाही अशा आयातीचा आत्मनिर्भरता आणि भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होणार नाही.
यावेळी त्या म्हणाल्या की,’ दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक कुंभारांकडून पारंपारिकपणे गणेश मूर्ती खरेदी केली जाते. मात्र, आज ती चीनमधूनही आयात केली जात आहे. ही परिस्थिती का आहे? आपण आपल्या घरगुती स्तरावर गणेश मूर्ती बनवू शकत नाही?
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.