लॉकडाऊनमुळे अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध मशिदीत १००० कबूतरांचा मृत्यू; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे फक्त माणसांनाच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांना देखील त्रास होतो आहे. अशाच एका घटनेत, अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध मजार-शरीफ मशिदीत पाळलेल्या जवळपास हजारो पांढऱ्या कबूतरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. हे कबूतर मशिदीत पाळले गेले होते आणि कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना खायला धान्य मिळाले नाही. लॉकडाऊनमध्ये मशिद उघडण्याची परवानगी नव्हती ज्याची शिक्षा या कबूतरांना मिळाली.

चॅनल न्यूज एशियाच्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे ही मशिद बरीच काळ बंद राहिली, ज्यामुळे या पक्ष्यांना धान्य मिळाले नाही आणि उपासमारीने त्यांचा मृत्यू झाला. मशिदीचे रखवालदार कय्यूम अन्सारी यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की कबुतरे सतत मरत होती कारण त्यांना धान्य घालायला कोणीही येत नव्हते. तो म्हणाला, ‘दररोज ३० पेक्षा जास्त कबुतरे मरत होती. आम्ही त्यांना या मशिदीबाहेरच दफन करायचो. कयूमच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत एक हजाराहून अधिक कबुतर मरण पावले आहेत.

१२ व्या शतकातील या मशिदीला ब्लू मस्जिद म्हणून देखील ओळखले जाते कारण त्याचे दगड निळ्या रंगाचे आहेत. लॉकडाऊन दरम्यान बंद असलेल्या अनेक धार्मिक इमारतींपैकी एक ही मशिद देखील आहे. अफगाणिस्तानात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या ही २१ हजारांपेक्षा जास्त आहे मात्र असे मानले जाते की वास्तविक ही आकडेवारी यापेक्षा खूप जास्त असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment