राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीतील काही नेत्यांकडून एकमेकांबाबत कधी टीका तर कधी काही आरोप केले गेले. आघाडीत प्रामुख्याने निधी वाटपावरूनही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेत्याचे खटके उडाले. आता आघाडीतील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवरच हल्लाबोल केला आहे. “मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे, असा आरोप पाटोळेंनी केला आहे. त्यामुळे आघाडीतील काँग्रेस पक्षातील नाराजी आता समोर आली आहे.

नाना पटोले यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आज सकाळी ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत असलेली नाराजी याबाबत उघड मत मांडले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत असा आरोप पटोले यांनी केला आहे.

तसेच या आरोपांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये दुफळी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर पटोले यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे कृत्य करण्यात आले आहे. त्या कृत्याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असेही म्हंटले आहे.

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीची भाजपासोबत हातमिळवणी

दरम्यान नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत केलेल्या ट्विटबद्दल अधिक माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीच्या ताब्यात असाव्यात, अशी महाविकास आघाडीची भूमिका ठरली होती. पण भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीने भाजपासोबत हातमिळवणी केली. आणि त्यातून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. इतकेच नाही तर भिवंडीतही काँग्रेसचे एक नाही तर तब्बल १९ नगरसेवक राष्ट्रवादीने त्यांच्या ताब्यात घेतले. सोबत राहून अशा प्रकारे वर्तन केलं जात असेल तर हे बरोबर नाही, असेही पटोले यांनी म्हंटले.