हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका एका चित्रपटात शहारली आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाबाबत काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हे हे एक लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेला हिरो बनवण्याचे काम करु नये. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमोल कोह्ले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते फक्त कलाकार नाहीत. नथुराम गोडसेच्या विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघात व्यवस्थेला ताकद मिळण्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्षात घ्यावे. आणि यामध्ये लक्ष घालावे.
चित्रपटाच्या माध्यमातून नथुराम गोडसे सारख्या प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हे चुकीचे आहे. या देशाला फक्त महत्वा गांधींचाचा विचार तारु शकतो. त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेले आहे, असे पटोले यांनी सांगितले.