हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर राऊत एकाकी पडले असल्याची टीकाही भाजप नेत्यांनी केली होती. दरम्यान यावरून आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. “आज संजय राऊत यांनी जी मोहीम सुरु केलेली आहे त्याला काँग्रेसचा पाठींबा आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून राऊतांनी भ्रष्टाचारासंदर्भात भाजप नेत्यावर केलेले आरोप आहेत त्याची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
LIVE: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद https://t.co/pEu1OK0WoF
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 17, 2022
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी करत आहोत की, संजय राऊतांनी जे काही भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्या आरोपाची तातडीने चौकशी होणे गरजेची आहे. आणि गृहमंत्री यांनी यावर सातत्याने लक्ष ठेऊन याला कमी कालावधीमध्ये याबाबत निर्णय द्यावा.
आता राज्यात सरकार आपलं आहे. त्यामुलर राज्य सरकार असल्याने या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी आणि जे खरे आहे ते लोकांसमोर यावे. अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. सध्या राज्याला आणि राज्यातील राज्य सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र केले जात असल्याचेही पटोले यांनी सांगितले.