हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 50 टक्के निधीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली होती. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहात तर 50 टक्के पैसे तुम्ही द्या, 50 टक्के पैसे आम्ही देतो, असे म्हंटले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले,” असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, सध्या महाराष्ट्रातील काही पक्षांतील नेते हे महाराष्ट्राचे नेतृत्व करण्या ऐवजी ते गुजरात राज्याचत जास्त लक्ष घालत आहेत. त्या ठिकाणचे नेतृत्व करू लागले आहेत. त्यामुळे आता अशा नेत्यांच्या नेतृत्वाबद्दल शंका येत आहे, असे पटोले यांनी म्हंटले.
आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दानवे यांच्यावर केलेल्या टीकेला आता दानवे कशा प्रकारे उत्तर देतायत हे पहावे लागणार आहेत. मात्र, काल दानवे यांनी समृद्धी महामार्गाच्या नामांतराच्या विषयावरून पन्नास टक्के निधी देण्याचा मुद्दा उपस्थित केल्याने शिवसेनेकडूनही त्यांच्यवर निशाणा साधला जाईल हे नक्की.