अहमदनगर|
लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे.
“प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त हुआ. शुभकामनाओ सहित, आपका नरेंद्र मोदी. असे उत्तराच्या पत्रामध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णा हजारे यांना शुभेच्छा दिल्यामुळे, लोकांमध्ये हा खूप चर्चेचा विषय ठरला आहे. कुणी कुणी तर, मोदींनी अण्णांची थट्टा उडवल्याचे म्हटले आहे.
अण्णा हजारे म्हणाले, नरेंद्र मोदी यांना जवळपास ३७ पत्रे पाठवले आहेत. परंतु प्रधानमंत्र्यांनी अजून एकही पत्राला उत्तर दिले नाही. २०११ साली मोदी ज्यावेळी सरकारमध्ये नव्हते, आणि जेव्हा मी आंदोलन करत होतो तेव्हा हेच मोदी म्हणायचे, ‘अण्णा हजारे असे व्यक्ती आहेत की, लोकपाल बिलासाठी जीव द्यायला तयार आहेत.’ आणि ते समर्थनही देत होते. आता तेच मोदी पत्राला साधं उत्तरसुध्दा देत नाहीत.
२०११ चे आंदोलन
२०११-१२ ला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील रामलीला मैदानावर, युपीए सरकारच्या ‘भ्रष्टाचार’ विरोधात खूप मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात विद्यमान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास, किरण बेदी, प्रशांत भूषण असे खुप मोठमोठी लोक आंदोलनात सामील होते. आता ते राजकारणात सक्रिय आहेत.
इतर महत्वाचे –
आनंद तेलतुंबडे यांच्या पाठीशी कोण उभं राहणार?
हिंदू महासभेवर बंदी घालावी तर पूजा पांडेय यांच्यावर कारवाई व्हावी- ‘युक्रांद’ची मागणी