शिर्डी प्रतिनिधी | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून विधानसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेला प्रतित्तर म्हणून राष्ट्रवादीने हि यात्रा काढली आहे. या यात्रेत बोलताना अमोल कोल्हे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच लक्ष केले आहे.
शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट
सरकार सर्वच पातळीवर अपयशी आहे. सरकारने काम केले असते तर यात्रा काढण्याची वेळच आली नसती. सरकार सर्वच पातळीवर अपयशी असल्याने अपयश लपवण्यासाठी हि महाजनादेश यात्रा काढली गेली आहे असा सणसणीत आरोप अमोल कोल्हे यांनी शिर्डी येथील सभेत केला आहे. त्यांच्या या आरोपाला भाजप आता नेमके काय उत्तर देणार हे देखील बघण्यासारखे राहणारा आहे.
कृष्णा नदीत बचाव कार्याची बोट उलटून १५ जण बेपत्ता ; ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
दरम्यान अजित पवार यांनी देखील भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ‘पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणी सांगलीचा परीसर महापुराने ग्रस्त आहे. सरकारचा भोंगळ कारभार या गोष्टीला कारणीभूत ठरला. गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असताना अशी स्थिती का निर्माण झाली? सरकारचं नियोजन नसल्यानेच परिस्थिती ओढावली आहे,’ असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवारांची जीभ घसरली ; गिरीश महाजनांना म्हणाले ‘नाच्या’
म्हणून सुषमा स्वराज यांचे निधन होताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले
नरेंद्र मोदी यांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन
३७० कलमासंदर्भातील विधेयक लोकसभेत देखील संमत
अजित पवारांच्या त्या टीकेवर गिरीश महाजन म्हणतात