मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील अनेक आमदार भाजपमध्ये आणि शिवसेनेत पक्षांतर करू लागले आहेत. त्यांच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षावर चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार
गिरीश महाजन यांनी म्म्हन्ले आहे कि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीची स्थिती काय असेल असा प्रश्न पत्रकाराने जयंत पाटील यांना विचारला असता जयंत पाटील म्हणाले कि वातारण निर्मिती करण्यासाठी भाजप असे डाव टाकत आहे. उद्या मी देखील म्हणेल देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला होता आणि त्यांना राष्ट्रवादीत यायचे आहे असे जयंत पाटील म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे भाष्य केले आहे.
पक्ष सोडण्याआधी चित्र वाघ मला भेटल्या होत्या : शरद पवार
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या पक्षांतराच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे. ईडी आणि अँटीकरप्शन विभागाचा धाक दाखवून भाजप इतर पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेत आहे. आमच्या पक्षातून कोणी निघून गेले तर आम्हाला काही फरक पडत नाही. अशा स्थितीची आम्हाला सवय आहे त्यामुळे आम्ही यातून मार्ग काढू असे शरद पवार म्हणाले आहेत.
म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ
राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त
महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार
दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?