हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिमध्ये जर अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून मोकळे होतील, असे पडळकर यांनी म्हंटले होते. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “पडळकरांचे आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न आहे,”असा टोला मुंडेंनी लगावला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजच्या नेत्यांकडून अनेक प्रकारच्या टीका केल्या जात आहे. काल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. गोपीचंद पडळकरांचे आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न आहे. त्यांच्या आरोपांना काहीही किंमत नाही, असा टोला मुंडे यांनी लगावला आहे.
मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नावरून खडाजंगी झाली. अधिवेशनात पहिल्या दिवशी वीज बिल, शेतकरी नुकसान भरपाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भास्कर जाधव यांनी केलेली मिमिक्री यावरून भाजप नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज विरोधक कोणत्या प्रशांवरून सरकारला घेरणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.