हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पे कभी नही; एकनाथ खडसेंच्या महाजनांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात चांगलाच आरोप-प्रत्यारोप केले गेले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात अनेकवेळा टीका टिप्पणी झाली. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी महाजनांना शेरो शायरीतून टोला लगावला आहे. “हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पे कभी नही, अशी शायरी गिरीश महाजनांचे नाव न घेता खडसेंनी केली आहे.

जळगाव येथे काल एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी आपला शायरी अंदाजदाखवून दिला. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर शायरीतून निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, हम तो शेर पर एहसान किया करते है, हम चुहे पे कभी एहसान नही करते. तुम्हारे जैसे दुसरो के पर हम नही काटते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जळगावातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीने जिल्हा बँकेवर सत्ता स्थापन केली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र ऐन वेळी भाजपने माघार घेतली.