हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून आता ऐन महत्त्वाच्या वेळी लसींची कमतरता जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला आहे. मोदींनी फक्त पब्लिसिटी साठी परदेशात लसी पाठवल्या असा आरोप मालिकांनी केला आहे.
आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपद्धत योग्य नाही,’ अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली . आता हे सगळं सोडून देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा,’ अशी सूचनाही नवाब मलिक यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.