पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपच्या महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ यांच्यात आज सोशल मीडियावर चांगलीच खडाजंगी झाली. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने दिल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस आता पक्षाच्या नेत्यावर कारवाई करणार का? की क्लिनचिटच देणार असा सवाल सवाल राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी केला. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांचाही उल्लेख केला.
भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे नसतील तर त्यांनी कारवाई करुन दाखवावी असं चाकणकर म्हणाल्या. यावर चित्रा वाघ यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं. दोषींची गय केली जाणार नाही असं म्हणत तुमचे जास्त हसताना दिसणारे दात घशात घालायला वेळ लागणार नाही असं चित्रा वाघ म्हणाल्या.
ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलचं नेत्यांच्या चुकींचं समर्थन मी या आधीही केलं नाही आणि आताही करत नाही @BJP4Maharashtra चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही पोलिस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही @Dev_Fadnavis https://t.co/6kGVDcp3zZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 29, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.