काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माझे एकही काम झाले नाही : उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर टीका केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना माझे एकही काम झाले नाही असे म्हणत उदयनराजे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारवर टीका केली आहे.

अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपच्या महाप्रवेशातच उदयनराजेंच्या देखील प्रवेश करून घेतला जाईल असे बोलले जात होते. मात्र उदयनराजेंनी आपल्या भाजप प्रवेशावर सस्पेन्स कायम ठेवला आहे, आज त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. राष्ट्रवादीचे सरकार असताना माझे एकही काम झाले नाही असे उदयनराजे म्हणले आहेत.

भाजप प्रवेशाच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी काल उदयनराजेंच्या वतीने कार्यकर्त्यांची एक बैठक देखील बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना लोकहिताचा जो निर्णय असेल तो निर्णय घ्या आणि मला सांगा असे म्हणले आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादीने आज त्यांचीही शिष्टाई करण्यासाठी आमोल कोल्हे यांना पाठवले होते. मात्र त्यांचे देखील उदयनराजेंनी ऐकले नाही असे स्वतः अमोल कोल्हे यांनीच पत्रकार परिषदेत सांगितले आहे.