नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असलेल्या पेटीएम (Paytm) ने पुन्हा एकदा आपली सेवा वाढविली आहे. पेटीएमने आपली पोस्टपेड सेवा (Paytm Postpaid) चा विस्तार केला आहे. पेटीएम पोस्टपेड युझर्स आता त्यांच्या थकबाकीची रक्कम मासिक हप्ता किंवा ईएमआय (Equated Monthly Installments/EMI) मध्ये देऊ शकतात.
Paytm Postpaid म्हणजे काय ?
देशातील अनेक फिंटेक कंपन्या बाय नाउ पे लेटर (Buy Now Pay Later/BNPL) ची सुविधा देत आहेत. यावेळी पेटीएमने ही बाय नाउ पे लेटरची सुविधा दिली आहे. कंपनीने पेटीएम पोस्टपेड असे या सेवेचे नाव ठेवले आहे. पेटीएम पोस्टपेड आपल्या युझर्सना 1 लाख रुपयांपर्यंतचे क्रेडिट लिमिट देते. युझर्स क्रेडिट लिमिटमध्ये खर्च करू शकतात आणि पुढच्या महिन्यात पेमेंट देऊ शकतात किंवा ते ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतात.
आपण ही पेटीएम पोस्टपेड सेवा कोठे वापरू शकता
पेटीएम अॅपवर रिचार्ज, बिल पेमेंट किंवा शॉपिंग इत्यादीमध्ये तुम्ही पेटीएम पोस्टपेड सेवा वापरू शकता. या व्यतिरिक्त पेटीएम पार्टनर मर्चंटवर पेटीएम पोस्टपेडवरून पैसे भरू शकतात. विशेष म्हणजे पेटीएम पोस्टपेड युझर्स जवळच्या किराणा दुकानातही खरेदी करू शकतात.
पेटीएम पोस्टपेडचे 3 प्रकार
कंपनीने पेटीएम पोस्टपेडचे तीन वेरिएंट्स सादर केले आहेत. Lite, Delite आणि Elite असे त्याचे तीन प्रकार आहेत. पोस्टपेड लाईटमध्ये 20,000 रुपयांची मर्यादा आहे ज्यासह कन्वीनियंस फी ही मासिक बिलात जोडली जाईल. पोस्टपेड डिलिट आणि पोस्टपेड एलिट 20,000 ते 1 लाख रुपये पर्यंत मासिक क्रेडिट मर्यादा घेऊन येत आहेत. त्यासाठी कोणतीही कन्वीनियंस फी नाही आहे.
पेटीएम पोस्टपेड कसे एक्टिवेट करावे ?
कंपनी हळू हळू आपल्या ग्राहकांमध्ये पेटीएम पोस्टपेड सर्व्हिसचा विस्तार करीत आहे. आपण पात्र असाल तर आपण खाली दिलेल्या प्रोसेसला फॉलो करून पेटीएम पोस्टपेड सर्व्हिस एक्टिवेट करू शकता.
1. पेटीएम खात्यात लॉग इन करा आणि सर्च आयकॉनवर My Paytm Postpaid टाइप करा.
2. त्यानंतर Paytm Postpaid आयकॉनवर क्लिक करा.
3. यानंतर, KYC पूर्ण करा. KYC ची ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे.
4. KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची पेटीएम पोस्टपेड सर्विस एक्टिवेट होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.