हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण कधी उंदरांना पक्ष्यांची शिकार करताना पाहिले आहे का ? आपण हे नक्कीच पाहिलेले नसेल मात्र न्यूयॉर्कचे मोठे उंदीर आजकाल कबुतराची शिकार करीत आहेत. अशाच एका उंदरांच्या कबुतराव्ही शिकार करतानाचा एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, शहरांमध्ये राहणारे हे उंदीर कित्येक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे उपासमारिचा सामना करत असणार आणि म्हणूनच ते इतके आक्रमक झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, एक मोठा उंदीर घात लावून बसलेला आहे आणि कबुतर जवळ येताच तो कबुतराच्या तोंडाला पकडतो. हा व्हिडिओ ब्रूकलिन पार्क परिसरा जवळचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ही संपूर्ण घटना पाहिली आणि त्या कबुतराचा जीव वाचविला. ही व्यक्ती लोखंडी रॉडने उंदीरवर हल्ला करते, मात्र तरीही उंदीर कबुतराला बराच काळ धरून ठेवतो.
कबूतर जखमी झाले
या संपूर्ण घटनेत कबुतराच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र ते पळून गेले. फॉक्स -5 च्या अहवालानुसार न्यूयॉर्कच्या बर्याच भागातून आक्रमक उंदीर समोर येत आहेत. लॉकडाऊन दरम्यान रेस्टॉरंट्स बंद राहत आहेत आणि उपासमारीमुळे हे उंदीर इतके आक्रमक झालेले आहेत आणि मानवांवरही हल्ले करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”