मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पवर ३० मिनिट बोलावं – राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता अर्थसंकल्पेयातील तरतुदींवर देशभर चर्चा घडत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजेटवर ३० मिनिटं बोलावं असं चॅलेंज भाजप नेते निलेश राणे यांनी दिले आहे.

देशाचा बजेट आज जाहीर झाला, मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे… अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिट बोललं पाहिजे. असं ट्विट राणे यांनी केले आहे.

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था गडगडलेली असताना हा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यात निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सुरुवातीलाच कोरोना लसीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्रासाठीही अनेक घोषणा केल्या आहेत.