हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यानंतर राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. यापार्श्वभुमीवर मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर भेट घेतली आहे. यावरुन निलेश राणे यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात ? असा सवाल राणे यांनी केला आहे.
काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं. https://t.co/mL4E5jS1cA
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 14, 2021
काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? असं म्हणत राणे यांनी हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो अशा शब्दांत राणे यांनी आवाज उठवलाय. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं असा प्रश्नही राणे यांनी यावेळी विचारला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्या महिलेवर आता भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनिष धुरी यांनी हनिट्रेपचा आरोप केला आहे. यामुळे याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. आता मुंबई पोलिसा यावर काय कारवाई करतात यावर सर्वांचे लक्ष्य लागले आहे.