शिवसेने वाले 10 रुपयाची पावती फाडून खंडणी घेतात..राष्ट्रवादी डायरेक्ट 100 कोटी – राणे

0
64
Sharad Pawar and Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शनिवारी गंभीर आरोप केले. महिण्याला 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे. यावर निलेश राणे यांनी शिवसेने वाले 10 रुपयाची पावती फाडून खंडणी घेतात..राष्ट्रवादी डायरेक्ट 100 कोटी म्हणत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

वाजे गाडी मध्ये पैसे मोजायची मशीन घेऊन फिरतात…त्याच खरं कारण हे आहे तर असं म्हणत राणे यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर टिला लगावलाय. देशमुख साहेब मानला पाहिजे तुम्हाला. डायरेक्ट १००कोटी. असं म्हणत राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली आहे.

दरम्यान, १०० कोटींचा लावला चुना बोला राष्ट्रवादी पुन्हा असं म्हणत राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. ट्विटरच्या माध्यामातून राणे यांनी आपले मत मांडले आहे. विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here