औरंगाबाद | शहरात दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा परिषद विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात आणखीन नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत दोन हजार 400 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दर दिवशी तीनशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. यात औरंगाबाद, गंगापूर, कन्नड वैजापूर, पैठण तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढत आहे. ही वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात रुग्णांना त्याच ठिकाणी योग्य उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून आणखी नऊ सेंटर सुरू केले आहेत.
या अगोदर 15 covid-19 केअर सेंटर सुरू होते. त्यात नवीन 99 सेंटर सुरू करण्यात आले आहेत, नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये औरंगाबाद दिल्ली पब्लिक स्कूल शरणापूर, वैजापूर शासकीय मागासवर्गीय मुलींची निवासी शाळा, फुलंब्री तालुक्यात राजश्री शाहू पाथरी, गंगापूर तालुक्यात राजापूर सैनिक स्कूल, सिद्धांत वडगाव कन्नड तालुक्यात विनायकराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी नवीन कोविड सेंटर सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group