चीनमधून यापुढे निकृष्ट दर्जाची इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात केली जाणार नाहीत, सरकारने उचलली ‘ही’ पावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चीनमधील खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic Items) आयात करण्यावर बंदी आणण्यासाठी भारताने 7 प्रोडक्टस कंपलसरी रजिस्ट्रेशन ऑर्डर (Cumpolsary Registration Order) मध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा आदेश लागू झाल्यावर चीनमधून खराब क्वालिटीचे डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा वेब वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, वायरलेस हेडसेटच्या आयातीवर बंदी आणू शकेल. आता फक्त ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS – Bureau Standards of India) प्रमाणित केल्यावरच त्यांची आयात होऊ शकेल नाहीतर नाही.

आता प्रमाण न घेता वस्तू आयात करणे शक्य होणार नाही. सरकार ने WTO ला या वस्तूंची लिस्ट दिलेली आहे. या कंपन्यांना BIS प्रमाणित होण्याकरिता 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या लिस्ट मध्ये डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा वेब वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, एलइडी डिमर, वायरलेस हेडसेट समाविष्ट आहेत.

सरकार ने 2012 मध्येच कंपलसरी रजिस्ट्रेशन ऑर्डरच्या दिशानिर्देश जारी केले आहे. या दिशानिर्देशांच्या आधारे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या मानकात येणाऱ्या वस्तूंचीच आयात करण्याला परवानगी देण्यात येते.

अद्यापपर्यंत असे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी सेफ्टी स्टॅन्डर्स पूर्ण केले जात नव्हते. BIS टेस्टिंग सर्व्हिसनंतरच या प्रोडक्टसना लायसन्स घेता येते. त्यानंतरच या प्रोडक्ट्सची भारतात आयात करता येऊ शकते. भारतात मध्ये सबस्टँडर्ड प्रोडक्ट्सची आयात रोखल्यानंतरच घरगुती उद्योगाला चालना मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment