ऑगस्ट पर्यंत चालणार नाही सामान्य ट्रेन? रेल्वे सर्क्यलर मधून मिळाली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात देशातील सर्व लोकांना रेल्वे सुविधा कधी सामान्यपणे सुरु होतील हे जाणून घ्यायचे आहे. कोविड -१९ च्या कारणास्तव जवळपास तीन महिन्यांपासून रखडलेल्या गाड्यांचे कामकाज या क्षणी ती सुरु होणे अपेक्षित नाही, कारण 14 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या सर्व नियमित वेळापत्रकच्या रेल्वेची तिकिटे भारतीय रेल्वेने रद्द केलेली आहेत. प्रवाशांना यासाठीच पूर्ण परतावा देण्यात येईल. रेल्वेच्या निर्णयावरून हे स्पष्ट झाले आहे की,आता सामान्य प्रवासी गाड्या सुरू होण्यास बराच काळ लागू शकेल.

उशीर का होऊ शकतो – टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने सोमवारी सर्व झोनला परिपत्रक जारी केले आणि 14 एप्रिल किंवा त्यापूर्वी बुक केलेली सर्व तिकिटे रद्द करण्याचा आणि तिकिटांचे संपूर्ण पैसे परत देण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच असा विश्वास आहे की रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू होण्यास वेळ लागेल.

हा आदेश सोमवारी जारी करण्यात आला- आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार सिस्टममध्ये ट्रेन रद्द झाल्यानंतर भारतीय रेल्वेमार्फत ऑटोमेटिक फुल रिफंड द्यायला सुरू केले जाईल. दरम्यान, भारतीय रेल्वे तत्काळ प्रवासासाठी नियुक्त केलेल्या मार्गांवर 230 IRCTC च्या विशेष गाड्या चालूच राहील. कोरोना विषाणूचा किंवा कोविड -१९ च्या प्रसाराचा विचार करता भारतीय रेल्वेने 15 एप्रिलपासून नियमित रेल्वे सेवांसाठी अ‍ॅडवांस रिजर्वेशन करायला स्थगित केले. देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 25 मार्चपासून राष्ट्रीय वाहतूक करणाऱ्या सर्व नियमित रेल्वे सेवा या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

मात्र, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी आणण्यासाठी रेल्वेने 12 मे रोजी IRCTC ची स्पेशल रेल्वे सेवा सुरू केली. सुरुवातीला या IRCTC च्या विशेष गाड्यांमध्ये 30 राजधानी- स्टाइल वातानुकूलित गाड्यांचा समावेश होता. त्यानंतर 1 जूनपासून नॉन-एसी स्लीपर ट्रेन सेवांसह 200 इतर IRCTC च्या स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.