मुंबई । मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. अशा गंभीर स्थितीत सरकारतर्फे मोठ्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. मात्र जिथून या उपाययोजनांची सूत्र हलवली जातात त्या मंत्रालयात आता कोरोनानाने शिरकाव केला आहे. मंत्रालयात एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष बाब म्हणजे परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या सचिवांच्या विशेष गटात या अधिकाऱ्याचा समावेश होता. संबंधित अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
या आधीच मंत्रालयत ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. प्रधान सचिवांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता मंत्रालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी सहावर गेली आहे. मुंबईत कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. रस्त्यावर २४ तास ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे अशातच आता मंत्रालयात देखील कोरोनाने घुसखोरी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”